। लोकजागर । फलटण । दि. 03 जुलै 2025 ।
मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका मध्यवर्ती कार्यालयाच्या सौजन्याने वारकर्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीरास फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनकडून मोफत औषध पुरवठा करण्यात आला. या उप्रकामासाठी अजंता फार्मा, एफ.डी.एस. फार्मा, आयपीसीए फार्मा या औषध कंपन्यांचे सहकार्य लाभले.

या मोफत आरोग्य शिबीरामध्ये आर्यांग्ल हॉस्पिटल, सातारा येथील डॉक्टर तसेच फलटण येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकुंद जाधव व डॉ. स्वप्ना जाधव यांनी सेवा दिली.

दरम्यान, या उपक्रमाबद्दल फलटण तालुका केमिस्ट असोसिएशनचे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कौतुक केले. तसेच उपक्रमात सहभागी झालेल्या डॉक्टरांचा सत्कार श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
