राज्यात १७ नव्या ग्रामपंचायतींना हिरवा कंदील

| लोकजागर | फलटण | दि. १२ ऑगस्ट २०२५ |

महाराष्ट्रात ग्रामविकास व पंचायतराज विभागाने १७ नव्या ग्रामपंचायतींच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३ (खंड छ) व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४ अन्वये या ग्रामपंचायती स्थापन करण्यात येणार आहेत. संबंधित शासन आदेश मान्य करून राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यात चिंद्रवली व उमरे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात निंबायती व रामपुरा, पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात ढाकाळे व खामगळवाडी, जुन्नर तालुक्यात एडगाव व भोरवाडी, दौंड तालुक्यात गार, बेटचीवाडी, मवीनगार, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पाथरवाला बुद्रुक व कुरण, तसेच बदनापूर तालुक्यात हिवराराळा व हनुमान नगर आणि नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात पोटा व चनकापूर या गावांचा समावेश आहे.

या ग्रामपंचायतींच्या स्थापनेमुळे गावांचा विकास अधिक गतीने होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Spread the love