भाविक व प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; फलटण – आदमापूर बससेवा सुरू

| लोकजागर | फलटण | दिनांक १३ ऑगस्ट २०२५ |

प्रवाशांच्या व भाविकांच्या सोयीसाठी तसेच नागरिकांसह राष्ट्रीय समाज पक्षाच्या सातत्यपूर्ण मागणीला यश मिळत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, सातारा विभागाच्या फलटण आगारातून फलटण-आदमापूर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही सेवा १४ ऑगस्ट २०२५ पासून नियमितपणे धावणार आहे.

सदर बस फलटणहून कोल्हापूरमार्गे आदमापूरला जाणार असून मार्गात पुसेगाव, पुसेसावळी, औंध, कराड, कोल्हापूर आदी ठिकाणांवरून प्रवाशांना सोयीची सुविधा उपलब्ध होणार आहे.

बस वेळापत्रकानुसार दुपारी १२.३० वाजता फलटणहून सुटून संध्याकाळी ६.३० वाजता आदमापूरला पोहोचेल. तर सकाळी ७.०० वाजता आदमापूरहून सुटून दुपारी १.०० वाजता फलटणला पोहोचेल.

ही सेवा सुरू झाल्याने भाविकांना मंदिरदर्शनासाठी तसेच प्रवाशांना प्रवासासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार असून, नागरिकांनी या सेवेला चांगला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एसटी प्रशासनाने केले आहे.

Spread the love