फलटण रस्ते विकासासाठी रणजितदादांचा केंद्रात पाठपुरावा; गडकरींनी दिला सकारात्मक प्रतिसाद

| लोकजागर | नवी दिल्ली | दि. २० ऑगस्ट २०२५ |

माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन फलटण शहर व परिसरातील महत्त्वाच्या रस्ता विकास प्रकल्पांचा मुद्दा मांडला. या भेटीला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या भेटीत फलटण शहरासाठी अंदाजे १६ किमीचा बाह्य वळण मार्ग, पालखी महामार्गावरील सुरवडी पुलाची लांबी वाढविणे, शहरातील रस्त्यांच्या निविदा पुनःप्रकाशित करणे, तसेच सीतामाई घाट रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय फलटण व म्हसवड MIDC ला ग्रीन इंडस्ट्रियल कॉरिडॉर दर्जा आणि एअरस्ट्रीप प्रकल्पासाठीही पाठपुरावा करण्यात आला.

या प्रकल्पांना केंद्रीय रस्ता निधी (C.R.F.) अंतर्गत मंजुरी मिळावी अशी मागणी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित कामांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

Spread the love