श्री सदगुरु पतसंस्थेच्या सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर

। लोकजागर । फलटण । दि. 20 सप्टेंबर 2025 ।

श्री सदगुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या., फलटण यांच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांना ११ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. संस्थेने पारदर्शक व काटकसरी पद्धतीने काम करून उद्दिष्टपूर्तीसाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे गौरवोद्गार सदगुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी काढले.

यावेळी चेअरमन श्री. तेजसिंह भोसले, व्हा. चेअरमन राजाराम फणसे, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, संचालक तुषार गांधी, अ‍ॅड. सौ. मधुबाला भोसले, चंद्रकांत बर्गे, प्रभाकर भोसले, सौ. स्वाती फुले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सध्या संस्थेकडे ७४ कोटी १६ लाख ठेवी असून ६० कोटी ३५ लाख रुपये कर्जवाटप झाले आहे. आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी १२ लाख १० हजार रुपयांचा नफा झाला असून त्यातून सभासदांना ११ टक्के लाभांश देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व श्रद्धांजली अर्पणानंतर सभेला सुरुवात झाली. सरव्यवस्थापक संदिप जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. ठेवीदार, कर्जदार व सभासदांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात सभा यशस्वीपणे पार पडली.

Spread the love