। लोकजागर । फलटण । दि. 25 सप्टेंबर 2025 ।
आसू (ता. फलटण) येथील शेतकरी कुटुंबातील कु. वेदिनी अमोल साबळे हिची डेगेनडोर्फ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, डेगेनडोर्फ, बव्हेरिया (जर्मनी) येथे एम.एस. या दोन वर्षांच्या उच्च शिक्षणासाठी निवड झाली असून या यशाबद्दल तिचे विविध स्तरांवरून अभिनंदन होत आहे.

कु. वेदिनी साबळे ही फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मिडियम स्कूल, फलटणची विद्यार्थिनी असून तिने कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून बी. फार्मसी आणि भारती विद्यापीठ, मुंबई येथून एम.बी.ए. फायनान्स हे शिक्षण पूर्ण केले आहे.

कु. वेदिनी साबळे ही मिलाग्रो क्लिनिकल रिसर्च, मुंबईच्या संचालिका डॉ. अंजली अमोल साबळे यांची कन्या तसेच नीरा उजवा कालवा विभागातील निवृत्त कालवा निरीक्षक बाबासाहेब साबळे, आसू यांची नात आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सोसायटी नियामक मंडळाचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, गोविंदच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीराम कारखान्याचे संचालक स्वामीनाथ साबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कु. वेदिनी साबळे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
