श्री सदगुरु शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत उज्ज्वल यश

। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।

तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा छत्रपती शिवाजी हायस्कूल, गिरवी येथे यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेत श्री सदगुरु शिक्षण संस्था, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर, फलटण आणि सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण यांचे खेळाडू सहभागी झाले आणि उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.

स्पर्धेतील प्रमुख विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे ठरले:

  • अविराज आनंदा धायगुडे – 35 किलो वजन गट – प्रथम क्रमांक
  • वेदांत राजेंद्र सुळ – 35 किलो वजन गट – द्वितीय क्रमांक
  • अक्षय बाबू भंडलकर – 110 किलो वजन गट – प्रथम क्रमांक
  • सुजल गजानन बागल – 63 किलो वजन गट – प्रथम क्रमांक
  • पायल अमोल चव्हाण – 53 किलो वजन गट – प्रथम क्रमांक

वरील सर्व प्रथम क्रमांक विजेत्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड मिळवली असून, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्थेचे संस्थापक श्री. दिलीपसिंह भोसले, अध्यक्ष श्री. तुषार भाई गांधी, सचिव ॲड. सौ. मधुबाला भोसले), प्रशासकीय संचालिका सौ. स्वाती फुले, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्री. प्रदीप चव्हाण, सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री. नागेश पाठक, क्रीडा शिक्षक संदीप ढेंबरे तसेच शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Spread the love