। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर येथे श्रीमंत अनंतमालादेवी शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने द्वितीय पुष्प गुंफण्याचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात PSI अयोध्या घोरपडे यांनी महिला व बाल सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना पालक व शिक्षकांनी मुलांशी सतत संवाद ठेवावा, मोबाईलचा वापर कमी करावा आणि मुलांच्या सुरक्षेसाठी जागरूक राहावे असे प्रतिपादन केले.

मानसोपचार तज्ञ उत्कर्षा लोंढे यांनी पालकांनी मुलांशी संवाद साधण्याच्या पद्धतीवर मार्गदर्शन केले. प्रशालेच्या चेअरमन वसुंधरा नाईक निंबाळकर यांनीही या प्रसंगी मार्गदर्शन केले.

श्रीमंत अनंतमालादेवी व दुर्गादेवी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे, मुधोजी बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका रजपूत मॅडम, शिक्षक व पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रुपेश शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन उज्वला गोरे यांनी केले तर आभार छाया पवार यांनी मानले.
