फलटण पालिका निवडणूक : पाचव्या दिवशीही अर्ज शून्य

| लोकजागर | फलटण │दि. १४ नोव्हेंबर २०२५ |

फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज 14 नोव्हेंबर 2025 रोजीही एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सलग पाचव्या दिवशी सर्व 13 प्रभागांमध्ये अर्जांची संख्या शून्य राहिली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अद्याप ३ दिवसांचा अवधी असला तरी, सुरूवातीचे पाचही दिवस अर्ज न येणे हे फलटणमधील राजकीय वातावरणात अनेक शंका-कुशंकांना वाव देत आहे. विविध पक्ष आणि गटांतर्फे पडद्यामागे चर्चांना वेग आला असून, उमेदवारांच्या अंतिम नावांवर अजूनही निर्णयप्रक्रिया सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

पालिका मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजच्या पाचव्या दिवशीही सर्व प्रभागांमध्ये एकूण शून्य अर्ज प्राप्त झाले.
आगामी दोन-तीन दिवसांत चित्र कसे बदलते, याकडे मतदारांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत होऊ लागले आहे

Spread the love