| लोकजागर | फलटण | दिनांक 17 नोव्हेंबर 2025 |
फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणांना वेग आला असून आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत दिलीपसिंह भोसले यांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
भोसले यांनी स्पष्ट केले की, “फलटणमध्ये बदलाचे वातावरण तयार झाले आहे. जर आपण तिरंगी लढत करून बसलो, तर त्याचा थेट फायदा विरोधकांना होईल आणि आपल्या पदरात पराजय येण्याची शक्यता वाढेल. माझ्याकडून उमेदवारी अर्ज भरलेला नव्हता, उमेदवारीची अपेक्षा होती; पण माझा ठाम पाठिंबा समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनाच राहील.”
बैठकीदरम्यान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे-पाटील, श्रीमंत शिवरूप राजे खर्डेकर, सौ. जिजामाला नाईक निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या पाठिंब्यामुळे स्थानिक राजकारणात नवीन घडामोडी घडण्याची शक्यता वाढली असून निवडणुकीत वेगळे चित्र दिसण्याची चिन्हे आहेत.
