। लोकजागर । मुंबई । दि. १३ जानेवारी २०२६ ।
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या आगामी निवडणुकांच्या संदर्भात आज एक महत्त्वाची घडामोडी घडणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे यांनी आज, मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेत निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठीची तयारी पूर्ण केली असून, त्याबाबतची अधिकृत माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकार परिषदेचा तपशील:
- स्थळ: सह्याद्री अतिथिगृह, मलबार हिल, मुंबई- ४००००६.
- वेळ: आज दुपारी ठीक ४.०० वाजता.
- विषय: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम व घोषणा.
गेल्या काही काळापासून प्रलंबित असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आजच्या या संवादामुळे निवडणुकीचे नेमके वेळापत्रक आणि आचारसंहितेबाबतचे चित्र स्पष्ट होईल. राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी याबाबतचे निमंत्रण सर्व वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना दिले आहे.
