सालाबादप्रमाणे परतीच्या प्रवासात कावडीचे राजवाडा परिसरात आगमन; भव्य आरती आणि भाविकांच्या उपस्थितीत पार पडला भक्तीमय सोहळा.
। लोकजागर । फलटण । ०३ एप्रिल २०२६ ।
सासवड येथील प्रसिद्ध भुतोजी बुवा तेली (तेल्या भुताची) यांची मानाची कावड परतीच्या प्रवासात सालाबादप्रमाणे फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिर, राजवाडा येथे दाखल झाली. या निमित्ताने राजवाडा परिसरात भक्तीमय वातावरणात ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते कावडीची विधिवत अभिषेक आरती करण्यात आली.
परंपरेनुसार सासवडहून येणारी ही मानाची कावड फलटणमध्ये मुक्कामासाठी येते, जिथे राजे घराण्याकडून तिचे जंगी स्वागत केले जाते. अभिषेक सोहळ्यानंतर श्रीमंत अनिकेतराजे यांनी कावडीचे प्रमुख आणि मानकरी यांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित आदर सत्कार केला.
