पक्षाला बळकट करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांचे मार्गदर्शन; फलटणमध्ये पदाधिकाऱ्यांचा मोठा मेळावा संपन्न.
। लोकजागर । फलटण । १३ एप्रिल २०२६ ।
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी देशभरात राबविल्या जाणाऱ्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत फलटण येथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट करण्यासाठी महाराष्ट्रात हे अभियान एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
या बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक आणि हिमाचल प्रदेशातील इंदोरा मतदारसंघाचे आमदार मलेंद्र राजन यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि बूथ पातळीवर संघटना अधिक सक्रिय करण्याचे आवाहन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय बालगुडे आणि राजेंद्र शेलार यांनीही अभियानाच्या स्वरूपावर प्रकाश टाकला.
या मेळाव्याला प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, फलटण शहर अध्यक्ष पंकज पवार, सेवादल जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र खलाटे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष अल्ताफ पठाण, बालमुकुंद भट्टड, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे, युवक सेल अध्यक्ष गंगाराम रणदिवे, ताजुद्दीन बागवान, ओबीसी सेल शहर अध्यक्ष विकास ननावरे, अभिजित जगताप यांच्यासह फलटण आणि माण तालुक्यातील काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यामुळे फलटण शहर आणि तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून, पक्ष संघटनेला नवी दिशा मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.
