फलटण : आपल्या भारताची लोकशाही जगात प्रसिद्ध आहे. लोकशाही जास्तीत जास्त प्रगल्भ होण्यासाठी ‘आई-बाबा प्लीज तुम्ही अवश्य मतदान करा’, असे आवाहन चिमुकल्याने स्वतः पत्र लिहून केले.
मतदान जनजागृती कार्यक्रमांअतर्गत येथील प्राथमिक शाळा जिल्हा परिषद तडवळे, ता. फलटण, जि. सातारा येथे घेण्यात आला. यावेळी स्वीप सहायक अधिकारी फलटण श्री. सचिन जाधव, कृषि सहायक श्री. हेमंत धापटे तसेच गेजगे सर व स्वीप टीम उपस्थित होती.
यावेळी श्री. सचिन जाधव यांनी लोकशाहीचा अर्थ सोप्या भाषेत समजावून सांगितला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने व अत्यंत उत्सुकतेने पत्र लिहिले. भारताची लोकशाही जगात लोकप्रिय आणि महत्त्वाची आहे. ही लोकशाही अधिक प्रगल्भ होणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे. त्यामुळे मी तुम्हाला एक जबाबदार भावी नागरिक या नात्याने मतदान करावे, अशी नम्र विनंती पत्राद्वारे करत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदान, लोकशाहीचा अर्थ समजला. पत्रलेखनाचा उपक्रम त्यांनी प्रथमच अनुभवला. प्रत्यक्ष पोस्ट कार्डवर पत्र लिहिणे हे त्यांच्यासाठी नवीन होते, त्यामुळे सर्व विद्यार्थी वर्ग उत्साहात होते. श्री. गेजगे सर व शिक्षक यांनी पथकाचे आभार मानले.
3bytax