दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक ठिकाणी पर्यटकांना प्रवेश बंदी करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

लोकजागर, सातारा दि. 9: जिल्ह्याच्या काही भागात चांगला पाऊस सुरु आहे. पावसाळी पर्यटनासाठी नागरिक मोठ्या बाहेर पडतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये  यासाठी धबधबे, जलाशये यासारख्या धोकादाय ग्रामपंचायतींनी  प्रवेश बंदीचे फलक लावावेत.  त्याचबरोबर पाटण तालुक्यातील सडावाघापूर सारख्या ठिकाणी इतर ठिकाणी पोलीसांनी ग्रस्त वाढावावी व हुल्लडबाजांवर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी  अतिवृष्टी उपायोजनांबाबत दूरदृष्यप्रणालीद्वारे यंत्रणांचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

यावेळी त्यांनी पावसामुळे नाले, गटारी तुंबणार नाहीत यासाठी त्यांची स्वच्छता ठेवण्याचे निर्देश दिले. आवश्यक ठिकाणी गरजेनुसार नागरिकांचे स्थलांतर करावे लागल्यास त्यासाठी यंत्रणांनी सुरक्षित निवारे, त्या ठिकाणी पुरेसे अन्नधान्य, औषधसाठा याची तजबीज ठेवावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

दि. 9 जुलै रोजी सरासरी 30 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पाऊसामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही. औषध व धान्याचा पुरेसा पुरवठा झालेला आहे. अतिवृष्टीमुळे स्थलांतराची वेळ आसल्यास त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत सांगितले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यात चांगल्या प्रकारे सुरु आहे. घरोघरी जावून पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचा सातारा जिल्ह्याचा पॅटर्न अनेक जिल्ह्यांनी स्वीकारला आहे. या योजनेचे काम गतीने होण्यासाठी सर्व प्रांताधिकाऱ्यांनी यामध्ये समन्वय ठेवावो. शासनाने जारी केलेले अर्ज भरुन घेण्यात यावेत, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी सातारा जिल्ह्यात या योजनेचे काम  चांगल्या होत असल्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचा आढावा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन स्वत: घेत असून दररोज घेत असून येत्या 21 दिवसात जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी पूर्ण केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

Spread the love