फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी वारी पालखी रथ सोहळा दि. ४ नोव्हेंबर रोजी होणार मार्गस्थ

स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण यांनी फलटण ते अक्कलकोट पायीवारीसाठी तयार केलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा चांदीचा नवीन मुखवटा.

सोहळ्याचे यंदा सलग सहावे वर्ष

। लोकजागर । फलटण ।

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटण यांच्या पुढाकाराने फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी वारी पालखी रथ सोहळा सोमवार दि.4 नोव्हेंबर रोजी मार्गस्थ होणार असून या पायी वारी पालखी रथ सोहळ्यात लक्ष लक्ष पावलांनी भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, अहिल्यानगर, गजानन चौक, फलटण यांचेवतीने करण्यात आले आहे.

दरम्यान या फलटण ते श्री क्षेत्र अक्कलकोट पायी वारी पालखी रथ सोहळ्याचे यंदाचे सहावे वर्ष असून सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी पालखी पूजनाचा सोहळा सकाळी ९ : ३० वाजता होऊन रथ गजानन चौक, बुधवार पेठ श्री स्वामी समर्थ मंदिर, शंकर मार्केट, श्रीराम मंदिर, गजानन चौक, आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक चौक, एस. टी. स्टँड मार्गे अक्कलकोटकडे मार्गस्थ होईल, तरी सर्व भाविक भक्तांनी सकाळी ८ : ३० वाजता श्री स्वामी समर्थ मंदिरात उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

पायी वारी पालखी रथ सोहळा ४ नोव्हेंबर रोजी सकाळी व दुपारी विडणी, रात्री मुक्कामी वाजेगाव येथे थांबेल. ५ नोव्हेंबर रोजी सकाळी अल्पोपहार राजुरी, दुपारी भोजन धर्मपुरी, रात्री मुक्काम नातेपुते येथे होईल. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी मांढवे फाटा, दुपारी सदाशिवनगर, रात्री साठफाटा, पाटील वस्ती, माळशिरस येथे असेल. दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी खुडूस, दुपारी पिसे वस्ती खुडूस, तर रात्री जाधववस्ती तोंडले येथे मुक्कामाला असेल. दि. ८ नोव्हेंबर रोजी वाडी कुरोली, दुपारी भाळवणी, रात्री श्री क्षेत्र पंढरपूर येथे मुक्कामी राहील. दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी पंढरपूर येथे अल्पोपहार घेऊन दुपारी अंजनसोंड डुबल वस्ती येथे थांबेल व रात्री सुस्ते येथे मुक्कामाला असेल. दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी फुल चिंचोली, दुपारी वरकुटे काशीद वस्ती येथे असेल तर रात्री शेजबाभळ वरकुटे येथे मुक्काम करेल. दि. ११ नोव्हेंबर रोजी दुपारी कुरुल येथे भोजन व रात्री समाधान लॉन्स कामथी येथे थांबेल. दि. १२ नोव्हेंबर रोजी बेलाटी देगावं येथे थांबेल. दि. १३ नोव्हेंबर रोजी देगावं येथे अल्पोपहार, दुपारी सोलापूर व रात्री मुक्कामाला कुंभारी येथे असणार आहे. दि. १४ नोव्हेंबर रोजी दुधगी मार्गे वळसंग, ब्यागेहळी फाटा कोन्हाळी शिवार येथे थांबेल तसेच शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी अक्कलकोट, दुपारी खंडोबा मंदिर, समाधी मठ, वटवृक्ष मंदिर, अन्नछत्र मंडळ अक्कलकोट व त्या नंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला सोहळा फलटणला निघेल, असे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ फलटण च्या वतीने सांगण्यात आले आहे.

या पायी वारी सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे व त्यासाठी अविनाश भोसले 9604810677, संदीप सकट 8087985009, कुणाल वाघ 7887838970 या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Spread the love