‘श्रीराम’ कारखान्याकडून ३१०० रुपये प्रमाणे रक्कम जमा

। लोकजागर । फलटण । दि. १२ फेब्रुवारी २०२५ ।

श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण येथे दि. १ ते १५ जानेवारी २०२५ अखेर गाळपास आलेल्या ६७ हजार ११६ मे. टन ऊसाचे प्रतिटन ३१०० रुपये प्रमाणे विनाकपात एकरक्कमी एफ. आर. पी. २० कोटी ८० लाख ५९ हजार ६०० रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दि. ११ फेब्रुवारी रोजी वर्ग करणेत आले आहेत.

श्रीराम सहकारी साखर कारखान्यात सन २०२४ – २५ गळीत हंगाम दि. १५ नोव्हेंबर रोजी सुरु झाला, दि. १० फेब्रुवारी अखेर ३ लाख ९५ हजार ९९९ मे. टन ऊस गाळप झाले असून ४ लाख ५३ हजार ७०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.५४ टक्के पडला आहे.

या वर्षीच्या गाळप हंगामामध्ये दि. १५ जानेवारी अखेर एकूण ऊस गाळप २ लाख ७७ हजार ५९५ मे. टन इतके झाले असून विनाकपात एकरक्कमी दर ३१०० रुपये प्रती मे. टनाप्रमाणे एकूण ८६ कोटी ४ लाख ८२ हजार ५०० रुपये संपूर्ण ऊस पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खाती वर्ग करणेत आले आहे.

Spread the love