कृषि विभागाच्या फलटण संघाला चषक देवून सन्मानित करताना उमेश पाटील, सौ. भाग्यश्री फरांदे.
। लोकजागर । फलटण । दि. १७ फेब्रुवारी २०२५ ।
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्यावतीने अजिंक्य क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत सातारा येथे दि. १६ ते १६ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात फलटण तालुका कृषि विभाग संघाने क्रिकेट स्पर्धेत बाजी मारली.
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फलटण विरुद्ध कोरेगांव असा सामना झाला. त्यात फलटण संघाने विजय मिळवत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. सदर स्पर्धेत फलटण, कोरेगांवसह सातारा, वाई, महाबळेश्वर, खटाव, दहिवडी, कराड, पाचगणी, मेढा, जावली असे एकूण ११ संघ सहभागी झाले होते.

फलटण उपविभागीय कृषि अधिकारी खलीद मोमीन, तालुका कृषि अधिकारी फलटण दत्तात्रय गायकवाड, फलटण तंत्र अधिकारी सुहास रनसिंग व मंडळ कृषि अधिकारी व कृषि पर्यवेक्षक व फलटण तालुक्यातील कृषि सहाय्यक आदींचा विजेतेपदाबद्दल कोल्हापूर विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील व सातारा जिल्हा कृषि अधीक्षक भाग्यश्री फरांदे यांच्या हस्ते यावेळी चषक देऊन सन्मान करण्यात आला.