शुक्रवार पेठ तालीम मंडळाच्या रामेश्वर महागणपती मंदीरात आयोजित शिबीरामध्ये सहभागी झालेले फलटणकर नागरिक.
। लोकजागर । फलटण । दि.२२ फेब्रुवारी २०२५ ।
शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्यावतीने माजी नगरसेवक फिरोज आतार यांनी नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी रामेश्वर महागणपती मंदीरात शिबीराचे आयोजन केले होते. या उपक्रमात २८० नागरिकांनी सहभाग नोंदवला. त्यातील १९५ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त झाले असून या योजनेमार्फत त्यांना ५ लाख रुपया पर्यंतचे औषधोपचार मोफत मिळण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती फिरोज आतार यांनी दिली.

दरम्यान, सदर उपक्रमाबद्दल लाभार्थ्यांनी फिरोज आतार व शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाचे आभार मानले.