महाशिवरात्र निमित्त नाईकबोमवाडी येथील शिवजल मंदीर सर्वांसाठी खुले होणार

। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।

महाशिवरात्र निमित्त नाईकबोमवाडी ता.फलटण येथील शिवजल सिटीतील शिवजल मंदीर बुधवार दि.२६ फेब्रुवारी पासून सर्वांसाठी खुले होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी दिली.

नाईकबोमवाडी ता.फलटण येथील शिवजल सिटीत नव्याने स्थापना झालेले शिवशंभू महादेवाचे शिवजल मंदीर बुधवार दि. २६ फेब्रुवारी पासून सर्वांसाठी खुले होणार असून या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी सकाळी ८ ते ५ यावेळेत भव्य शिवजल उर्जा कलश पुजन श्री क्षेत्र नाशिक येथील यज्ञाचार्य वेदोपासक श्री भूषण शुक्ल गुरूजी यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.दरम्यान महायज्ञ, शिवअभिषेक, स्त्रोत, मंत्र, पूजा पठण करण्यात येणार आहे.

सायंकाळी ५ ते रात्री ८ यावेळेत अघोरी तांडव संपन्न होणार आहे.रात्री ८ ते ९ BSR अजमेर कोच श्री भुपेंद्र सिंग राठोड यांचे शिवजल उर्जा ध्यान ( मेडिटेशन ) कार्यक्रम होणार आहे.रात्री ९ ते १० शिवजल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांचे शिवजल उर्जा ध्यान ( मेडिटेशन ) कार्यक्रम होणार आहे.रात्री १२ ते ३ यावेळेत शिवजल स्वामी महायज्ञ संपन्न होणार आहे.दरम्यान रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत शिवजल जागर सुरू राहणार आहे. यादिवशी सकाळी ११ ते रात्री १२ पर्यंत शिवजल व फराळ वाटपाची व्यवस्था करण्यात आली आहे. याचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शिवजल ग्रुपच्या वतीने केले आहे.

Spread the love