श्रीमंत सिद्धसेनराजे खर्डेकर व चि.सौ.कां. कृष्णादेवी वैद्य यांचा विवाहसोहळा शाही थाटात संपन्न

। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।

सरलष्कर बहाद्दर जहागीरदार स्व.श्रीमंत यशवंतसिंह आप्पासाहेब निंबाळकर ऊर्फ श्रीमंत दादाराजे खर्डेकर व स्व.श्रीमंत सौ. सुदेष्णाराजे यशवंतसिंह निंबाळकर खर्डेकर यांचे नातू आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस फलटण तालुकाध्यक्ष सरलष्कर बहाद्दर जहागीरदार श्रीमंत शिवरुपराजे यशवंतसिंह निंबाळकर ऊर्फ बाळराजे खर्डेकर व श्रीमंत सौ. दिव्यांजलीराजे निंबाळकर खर्डेकर यांचे द्वितीय सुपुत्र चिरंजीव विजयीभव श्रीमंत सिद्धसेनराजे निंबाळकर खर्डेकर यांचा शुभविवाह श्रीमान डी. एन. वैद्य व सौ. क्षमा वैद्य यांची नात आणि श्रीमान सौ सीमा देवी व श्रीमान दिग्विजय दत्तात्रय वैद्य यांची कन्या चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी कृष्णादेवी यांच्या समवेत नुकताच पुणे येथे शाही थाटात संपन्न झाला.

वधू – वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूरचे खासदार शाहु छत्रपती, सातारच्या राजमाता श्रीमंत छ. कल्पनाराजे भोसले, छत्रपती संभाजीराजे, छत्रपती संयोगिताराजे, छत्रपती मधुरीमाराजे, छत्रपती शहाजीराजे, राजकुमारी यशस्वीराजे छत्रपती, माजी केंद्रीय गृहमंत्री तथा माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, श्रीमंत छत्रपती ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले,श्रीमंत छ. वेदांतिकाराजे भोसले, श्रीमंत छ. रुद्रनीलराजे भोसले व श्रीमंत छ. रुणलीराजे भोंसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, पुनर्वसन व मदतकार्य मंत्री ना. मकरंद पाटील, क्रीडा मंत्री ना. दत्तामामा भरणे, खासदार प्रणिती शिंदे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चेअरमन खा. नितीन काका पाटील, व्हा. चेअरमन अनिल देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. सचिन पाटील, बहिर्जीराजे घोरपडे, कार्तिकराजे घोरपडे, करणसिंह पवार (धार), सरदार सिद्धोजीराजे शितोळे, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख (कडेपूर सांगली) पद्मश्री मुरलीकांत पेटकर, लेफ्ट. जनरल भारद्वाज, लेफ्ट. जनरल निंबोळकर साहेब, चेकमेट कंपनीचे अध्यक्ष आणि ग्वाल्हेरचे सरदार विक्रमसिंग माहूरकर, समरजितसिंह राजे घाडगे, शर्मिलादेवी पवार, मदन दादा भोसले, प्रभाकर घार्गे, आ. मनोज घोरपडे,आ. रनजीत मोहिते पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, युवराज श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, गोवा कॅबिनेट मंत्री विश्‍वजीत प्रतापसिंह राणे, आ. देविया विश्‍वजीत राणे, सांडूर मँगनीजचे अध्यक्ष व सांडूरचे युवराज बहिर्जी घोरपडे, सत्यजीत पाटणकर, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, यांच्यासह राजकीय,शैक्षणिक,सहकार,उद्योग-व्यवसाय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नवदांपत्याला शुभ आशीर्वाद दिला.शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.

दरम्यान सायंकाळी सनई चौघडा,ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या रथातुन वधू वर यांची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या शाही विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.चि.सौ.का. कृष्णादेवी व सिध्दसेनराजे या जोडीवर नातेवाईकाकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.श्रीमंत धीरेंद्रराजे निंबाळकर खर्डेकर व श्रीमंत डॉ. सौ. संयुक्ताराजे निंबाळकर खर्डेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

Spread the love