। लोकजागर । फलटण । दि. १६ मार्च २०२५ ।
फलटण ते बारामती रस्त्यातील खड्डे, डिव्हाईडर तसेच रोडच्या कामाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका, अन्यथा कारवाईस सामोरे जावा, सदर कामाचा गुणवत्ता अहवाल सादर करा; अशा सक्त सूचना वजा आदेश फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांनी संबंधित अधिकारी व ठेकेदारांना दिला.

आमदार सचिन पाटील यांनी फलटण ते बारामती या राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत सोमंथळी व सांगवी या ठिकाणच्या सुरु असणार्या रस्त्याची कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्याच्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी संबंधित राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता व ठेकेदार यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजित नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, युवा नेते संतोष सावंत, चेअरमन महादेव अलगुडे, नाना मोहिते तसेच सोमंथळी व सांगवी गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.