जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांचा राज्याबाहेरील प्रशिक्षणासह अभ्यास दौरा संपन्न

। लोकजागर । सातारा । दि. २१ मार्च २०२५ ।

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मुल्यसाखळी विकास शाळा (VCDS) अंतर्गत प्रशिक्षणासह अभ्यास दौरा भारतीय बागवानी अनुसंधान संस्थान बंगलोर, कर्नाटक येथे दिनांक ११ ते १७ मार्च कालावधीत आयोजन करण्यात आला होता. या दौऱ्यासाठी ३० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता.

सदर अभ्यास दौऱ्यात फळ पिके, भाजीपाला पिके, फुले आणि औषधी पिके, पीक संरक्षण, मूलभूत विज्ञान, नैसर्गिक संसाधने, सामाजिक विज्ञान आणि प्रशिक्षण, कापणीनंतरचे तंत्रज्ञान,उत्पादन हाताळणी आणि कृषी अभियांत्रिकी या घटकांवर पूर्ण पणे मार्गदर्शन देण्यात आले. तसेच फळप्रक्रिया तंत्रज्ञान याविषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सोबत क्षेत्रीय भेटी दरम्यान विविध प्रात्यक्षिके प्लॉट व तंत्रज्ञान प्रत्यक्षात पाहायला मिळाले.

Spread the love