रासपच्या हिंगणगाव जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुखपदी सागर सुळ यांची निवड

। लोकजागर । फलटण । दि. ०३ एप्रिल २०२५ ।

राष्ट्रीय समाज पक्षाच्या हिंगणगाव जिल्हा परिषद गट संपर्क प्रमुख पदी कापशी (ता.फलटण) येथील सागर उर्फ लक्ष्मण सुळ यांची निवड करण्यात आली. यावेळी रासपचे फलटण तालुकाध्यक्ष महादेव कुलाळ, रासप फलटण तालुका सचिव नितीन सुळ, नितीन काकडे यांच्यासह सुळ कुटूंबिय उपस्थित होते.

राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांच्या विचाराने प्रेरीत होवून पक्षाचे काम करणारे सागर सुळ यांच्या झालेल्या निवडीकडे तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ यांच्या येणार्‍या निवडणुकीतील व्युहरचनेचा भाग म्हणून पाहिले जात आहे..

दरम्यान, सदर निवडीनंतर बोलताना सागर सुळ यांनी सांगितले की, ‘‘फलटण तालुक्यातील पश्चिम भाग आजही विकासा पासुन दुर्लक्षितच राहिला आहे. पाणी प्रश्न, रस्ते विकास, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला, शेतकरी, सरकारी दवाखान्यांची दुरावस्था यांचे अनेक प्रश्न आहेत. यावर आपण काम करणार आहोत. काही महिन्यातच येऊं घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये सक्षम उमेदवार देऊन त्यांना प्रचंड मताधिक्याने आम्ही निवडून आणणार आहे व हिंगणगाव जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास साधुन, हिंगणगाव जिल्हा परिषद गट हा रासप चा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करणार असल्याची’’, ग्वाही सूळ यांनी यावेळी दिली.

Spread the love