। लोकजागर । फलटण । दि. २८ एप्रिल २०२५ ।
फलटण उपविभागातील DYSP राहुल रावसाहेब धस यांना पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांनी पोलीस महासंचालक पदक आज सोमवार, दिनांक २८ एप्रिल रोजी जाहीर केले. हे पदक पोलीस महासंचालक मुंबई यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र पोलीस दलातील तब्बत ८०० कर्मचारी यांना जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलातील उपविभागातील पोलीस अधिकारी राहुल रावसाहेब धस यांचा समावेश आहे.

पोलीस महासंचालक पदक जाहीर झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर व जिल्ह्यातील तसेच फलटण उपविभागतील सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी राहुल धस यांचे अभिनंदन केले आहे.