। लोकजागर । फलटण । दि. 20 जून 2025 ।
जिल्हा परिषद केंद्र शाळा झिरपवाडी येथे शाळेच्या पहिल्या दिवशी फलटण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सतिश कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी विस्तार अधिकारी गौंड, केंद्रप्रमुख सोमनाथ लोखंडे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष दीपक गायकवाड, शिक्षण समितीचे तज्ञ मार्गदर्शक शिक्षक महादेवराव गुंजवटे, मुख्याध्यापक विकास गोडसे, सस्ते सर, नाळे सर, सस्ते मॅडम, सौ. माने, पोमणे मॅडम, येवले मॅडम, पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गट विकास अधिकारी सतिश कुंभार यांनी विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला व खाऊ वाटप करून शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच नवीन दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

