। लोकजागर । फलटण । दिनांक 2 जुलै 2025 ।
सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघ, सातारा यांच्यावतीने सेवासंघाचे प्रेरणा स्थान गुरुवर्य बॅ. पी. जी. पाटील यांच्या 104 व्या जयंती निमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दिनांक 3 जुलै 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता संपन्न होणार्या या कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार असून श्रीराम एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी – बेडके यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक सेवानिवृत्त रयतसेवक प्राचार्य शांताराम आवटे यांनी दिली.

या अभिवादन कार्यक्रमानिमित्त सांस्कृतिक मूल्ये जपणारे – गुरुवर्य बॅ. पी. जी. पाटील या विषयावर रविंद्र बेडकिहाळ यांचे प्रमुख मार्गदर्शन होणार असून कार्यक्रमास सातारा जिल्हा माध्यमिक शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक सेवासंघाचे अध्यक्ष एस. बी. खराते, उपाध्यक्ष टी. के. बाबर, विद्या सचिव ए. आर. माने, सचिव आर. एल. नायकवडी, खजिनदार डी. एस. ढवाळ हे देखील उपस्थित राहणार असून फलटण शहर, तालुका आणि सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राशी निगडीत आणि ‘रयत’ परिवारातील सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही प्राचार्य शांताराम आवटे यांनी केले आहे.

