। लोकजागर । फलटण । दि. २५ जुलै २०२५ |
येथील गुरुवर्य प.पू.श्रीराम काका देवळे यांच्या सेवेतून साकार झालेल्या नाथ दरबारी श्री मच्छिंद्रनाथ महाराज यांचा वार्षिक उत्सव येथील ‘नवनाथ द्वार’, पद्मावती नगर येथे श्री नवनाथ भक्त मंडळ, श्री सद्गुरु मच्छिंद्रनाथ महाराज दरबार, फलटण यांच्यावतीने शनिवार, दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केला आहे.

याबाबत दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, उत्सवादिवशी सकाळी 6 वाजता गंधलेपन, सकाळी 7 वाजता श्रींचा रुद्र अभिषेक, दुपारी 12 वाजता महाआरती, दुपारी 1 ते 4 महाप्रसाद, सायं. 6 वाजता आकर्षक चित्ररथात श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा, रात्री 8:30 वाजता आरती व रात्री 10 नंतर श्री नवनाथ भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न होणार असून भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
