सहकारी संस्थेतील अधिकारी, कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे आवश्यक : दिलीपसिंह भोसले

श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी शितल अहिवळे; रविंद्र बेडकिहाळ उपाध्यक्ष

। लोकजागर । फलटण । दि. 1 ऑगस्ट 2025 ।

‘‘सहकारी संस्था उत्तम कार्यक्षमतेने चालवायच्या असतील तर त्यांचे अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कारण, त्यांंच्या कार्यक्षमता अधिक पद्धतीने वाढल्या तरच सहकारी संस्था आपले उद्दिष्ट गाठू शकतील’’, असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिलीपसिंह भोसले यांनी केले.

श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था मर्या; फलटण या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत संस्थेचे नूतन अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. शितल अहिवळे यांची तर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांची सर्वानमुनते बिनविरोध निवड केली. त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन दिलीपसिंह भोसले बोलत होते. यावेळी दिलीपसिंह भोसले यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.

‘‘आपल्या कार्यकाळात यावर्षी दोन महिन्यात एक याप्रमाणे 6 कार्यशाळा आयोजित करणेचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रशिक्षणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करुन देऊ’’, असा विश्‍वास यावेळी नूतन अध्यक्ष अ‍ॅड. शितल अहिवळे व नूतन उपाध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी सत्कारास उत्तर देताना व्यक्त केला.

याप्रसंगी अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, शितल अहिवळे, रविंद्र बेडकिहाळ, अ‍ॅड. नरसिंह निकम, श्री सद्गुरु व महाराजा संस्था समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप व सर्व संचालक उपस्थित होते.

Spread the love