ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांना ‘मिसाल वतन से मुहब्बत की…’ पुरस्कार

| लोकजागर | सातारा | ७ ऑगस्ट २०२५ |

गेंडामाळ, कब्रस्तान, सातारा येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘मिसाल वतन से मुहब्बत की…’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महान स्वातंत्र्य सेनानी इफ्तियाज मिर्झा मास्तर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ लेखक व पत्रकार या श्रेणीत पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यामध्ये सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके यांना सन्मानित करण्यात येणार आहे. केलेल्या कार्याचे स्मरण व प्रेरणा देण्यासाठी हा सोहळा आयोजित केला जात आहे.

यावेळी सैनिकांना मानवंदना, ध्वजारोहण, राष्ट्रगीतावर कार्यक्रम, मान्यवरांचे मार्गदर्शन, पुरस्कार प्रदान सोहळा आदी कार्यक्रम पार पडणार आहेत.

करंजे तर्फ बुधवार नाका, गेंडामाळ, कब्रस्तान , सातारा येथे १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८ वा.हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

जमिअत उलमा-ए-हिंद, सातारा आणि गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात समाजामध्ये देशभक्ती, मानवीकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे जागरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Spread the love