| लोकजागर | फलटण | दि. १३ ऑगस्ट २०२५ |
साताऱ्यातील खवैय्यांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणारा ‘देवत्व बेकर्स’चा स्पेशल मावा केक आता फलटणकरांनाही उपलब्ध होणार आहे. येथील भक्ती एंटरप्रायजेसमार्फत या मावा केकसह व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केक आणि साताऱ्याचे सुप्रसिद्ध ‘राजपुरोहित’ नमकीन पदार्थ १५ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने ‘स्वादोत्सव’ या नावाने होणाऱ्या शुभारंभाबाबत देवत्व बेकर्सच्या मालक अस्मिता पाटील आणि भक्ती एंटरप्रायजेसचे यशवंत खलाटे-पाटील यांनी माहिती दिली. राममंदिराशेजारील बुरुड गल्ली, कसबा पेठ येथे सुरू होणाऱ्या या विक्री केंद्रात खवैय्यांना साताऱ्याच्या चवीचा आनंद घेता येणार आहे.

‘देवत्व’चा मावा केक ड्रायफ्रूटने समृद्ध, शाकाहारी असून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह देश-विदेशात लोकप्रिय आहे. एकदा चाखल्यानंतर पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा हा मावा केक आता रामनगरीतही उपलब्ध होणार असल्याने फलटणकरांमध्ये उत्सुकता आहे.

याचबरोबर, सुप्रसिद्ध ‘राजपुरोहित’ नमकीनची फरसाण, बाकरवडी, चिवडा, शेव आदी उत्पादनेही पहिल्यांदाच फलटणमध्ये विक्रीसाठी येत आहेत.
संपर्क: 9421213656 / 9822973344