l लोकजागर l फलटण l दि.२० ऑगस्ट २०२५ l
नगरपरिषदेने जारी केलेल्या निवेदनानुसार, २७ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात मूर्ती विक्रीसाठी शहरातील वाहतूक सुलभतेसाठी महात्मा फुले चौक, मुधोजी क्लब कडील बाजू तसेच माळजाई मंदिर गेट परिसर या ठिकाणीच मूर्ती विक्रीसाठी स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील इतर कोणत्याही ठिकाणी स्टॉल लावल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा मुख्याधिकारी तथा प्रशासक फळटण नगरपरिषद यांनी दिला आहे.
