धुळदेवमध्ये रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात

| लोकजागर | फलटण | दि. २१ ऑगस्ट २०२५ |

फलटण तालुक्यातील धुळदेव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात, सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम सोमवार, दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या सदस्या सौ. प्रतिभाताई शिंदे, इतिहास अभ्यासक व ऐतिहासिक नाणी संग्राहक श्री. सचिन भगत व फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प प्रमुख श्री. पोपटराव बर्गे यांच्या उपस्थितीत झाले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. मोरे सर यांनी प्रास्ताविक केले, तर श्री. योगेश ढेकळे यांनी सेवा भारतीच्या सेवाकार्याची माहिती दिली.

प्रमुख वक्त्या सौ. प्रतिभाताई शिंदे यांनी रामायण व महाभारतातील उदाहरणांद्वारे रक्षाबंधनाचे महत्त्व स्पष्ट केले. श्री. सचिन भगत यांनी महिलांच्या सुरक्षेची गरज अधोरेखित केली.

या कार्यक्रमाला श्री. गावडे सर, श्री. जाधव तसेच १३० विद्यार्थी उपस्थित होती.

Spread the love