देवत्व मावा केकच्या गोड चवीवर फलटणकर फिदा

फलटणमध्ये ‘मावा महोत्सव’ – देवत्व बेकर्सचा

| लोकजागर | फलटण | दि.21 ऑगस्ट2025 |

लाखो खवय्यांच्या जिभेवर अधिराज्य गाजवणाऱ्या साताऱ्यातील सुप्रसिद्ध देवत्व बेकर्सचा मावा केक आता फलटणमध्येही उपलब्ध झाला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कसबा पेठेतील बुरुड गल्ली येथील भक्ती एंटरप्रायजेसमध्ये या मावा केकसह व्हॅनिला बटर केक, चॉकलेट केक विक्रीचा शुभारंभ झाला.

पहिल्याच दिवशी तब्बल ३०० पेक्षा जास्त मावा केकची विक्री होऊन फलटणकरांनी ‘स्वादोत्सवा’ची नवी नोंद केली. केकचा पहिला घास घेताच ‘व्वा, लई भारी, अप्रतिम, सुपर्ब…’ असे उत्स्फूर्त उद्गार ग्राहकांच्या तोंडून उमटले.

साताऱ्यातील शाहूनगर येथील देवत्व बेकर्सने शुद्ध शाकाहारी, ड्रायफ्रूटसमृद्ध मावा केकची ओळख निर्माण केली आहे. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, अथवा कोणताही खास उत्सव – देवत्वचा मावा केक हीच पहिली पसंती ठरते. केवळ महाराष्ट्र नव्हे तर मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह बंगळुरू, अहमदाबाद, दिल्ली, सुरतपर्यंत या केकचा गोडवा पोहोचला आहे. इतकेच नाही तर दुबई, कॅनडा, जर्मनीसारख्या देशांतील भारतीय ग्राहकांनीही या केकची चव घेत समाधान व्यक्त केले आहे.

सर्वसामान्य खवय्यांपासून सेलिब्रिटी, उद्योजक, शासकीय अधिकारी सर्वांनीच या मावा केकच्या स्वादाला मान्यता दिली आहे. एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा खावासा वाटणारा हा केक ग्राहकांच्या मनात ‘स्वादाचा ब्रँड’ बनला आहे.

याचसोबत, साताऱ्यातील राजपुरोहित यांच्या नमकीन पदार्थांची विक्रीही प्रथमच फलटणमध्ये सुरू झाली आहे. फरसाण, बाकरवडी, लसूण शेव, पोहा चिवडा, मेथी वडी यांचा आस्वाद घेऊन फलटणकरांनीही समाधान व्यक्त केले.

भक्ती एंटरप्रायजेसचे प्रो.प्रा. यशवंत खलाटे-पाटील यांनी सांगितले की, “देवत्व बेकर्स व राजपुरोहित यांच्या उत्पादनांची सेवा फलटणकरांना कायम उपलब्ध राहील. रोजचाच ‘स्वादोत्सव’ आमच्या शॉपमध्ये रंगत राहील.”

Spread the love