|लोकजागर |फलटण |दि.२३ ऑगस्ट २०२५|
कै. सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) उर्फ काका यांच्या जयंती व स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण यांच्या वतीने वृक्षरोप वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

१८ ते २१ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या अनुषंगाने मंगळवारी फलटण शहरातील व्यावसायिक वर्गास प्रत्येकी एक वृक्षरोप देण्यात आले.
शाळेच्या या उपक्रमाचे व्यावसायिक वर्गातून कौतुक झाले असून सर्वांनी प्रशालेचे आभार मानले.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्या सौ. गायकवाड एन. एम., उपप्राचार्य श्री. घनवट पी. डी. व पर्यवेक्षिका सौ. रणवरे सी. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी यांचीही उपस्थिती लक्षणीय होती.
या उपक्रमामुळे समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती घडून आली असून हा प्रयत्न कौतुकास्पद ठरला आहे.
