|लोकजागर | फलटण | दि. 24 ऑगस्ट 2025|
सेवा भारती फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प फलटण यांच्या वतीने शनिवार दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंगणगाव येथे रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने झाली. यानंतर श्री. जतु गार्डे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. श्री. योगेश ढेकळे यांनी रक्षाबंधनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सांगितले. तर रा.स. संघाचे प्रबोधन मंच प्रचारक श्री. बापू टकले यांनी या सणाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, देशप्रेम व बंधुत्वाची भावना कशी विकसित होते, याबाबत मार्गदर्शन केले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री. रमेश जाधव यांनी सेवा भारती विज्ञान प्रयोगशाळेचे आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आनंदाने रक्षाबंधन साजरे केले.
या कार्यक्रमासाठी श्री. पोपट बर्गे, श्री. बापू टकले, श्री. योगेश ढेकळे, श्री. जतु गार्डे, श्री. रमेश जाधव, श्री. गायकवाड, श्री. चांगण, श्री. मुळीक, सौ. क्षिरसागर, सौ. झणझणे यांसह शिक्षक व ११० विद्यार्थी अशा सुमारे १२० जणांची उपस्थिती होती.
