| लोकजागर | फलटण | दि 30 ऑगस्ट 2025 |
पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या महामार्गावर फलटणहून पुण्याकडे जाताना लोणंदजवळ तयार करण्यात आलेला बाह्य वळण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या ठिकाणी आवश्यक दिशादर्शक फलक न लावल्याने वाहनचालक मोठ्या संभ्रमात सापडत आहेत.

निरेहून फलटणच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी तात्पुरता फलक उभारण्यात आला आहे. मात्र पुण्याकडे जाणाऱ्यांना लोणंद बाह्य मार्गाची दिशा न समजल्याने अनेकांना अचानक थांबावे लागत आहे.

वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रवास सोयीसाठी संबंधित विभागाने तातडीने कायमस्वरूपी दिशा फलक लावणे गरजेचे आहे, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
बातमीचा विडियो पुढील लिंक वर पहा = https://youtube.com/shorts/a1EEP5P6ph8?si=bQ85YPPB0WJN4za7
