इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाची योजना; थकीत कर्ज  एकरक्कमी भरणा करणाऱ्यांना मिळणार  50 टक्के सवलत

| लोकजागर | सातारा | दि. ११ सप्टेंबर २०२५ |

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरक्कमी भरणा करणा-या लाभार्थीस थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची एकरक्कमी परतावा (OTS) योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. 

तरी महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थीनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावे. अधिक माहितीसाठी महामंडळाच्या सातारा जिल्हा कार्यालयाशी किंवा ०२१६२-२९५१८४  दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पी.एन. दळवी, यांनी केलेले आहे.

Spread the love