| लोकजागर | फलटण | दि. ११ सप्टेंबर २०२५ |
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फलटण तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सदगुरु शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त फलटण तालुका स्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटण येथे करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य रवींद्र येवले यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी सुप्रिया गाढवे व तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष दशरथ लोखंडे प्रमुख उपस्थित होते. स्पर्धेचे संयोजन क्रीडा शिक्षक संदीप ढेंबरे यांनी केले.
या स्पर्धेत १४, १७ व १९ वर्षे वयोगटातील मुलांचा समावेश होता. एकूण ११० खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
विजेते विद्यार्थी (जिल्हास्तरीय निवड):
- १४ वर्षे वयोगट – आर्यन खरात (सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल) तसेच श्रीनाथ निंबाळकर व निरंजन येळे (आनंदवन प्राथमिक विद्यामंदिर, फलटण)
- १७ वर्षे वयोगट – गौरव बोराटे (सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल)
- १९ वर्षे वयोगट – संकल्प सस्ते व रुद्रप्रताप जाधव (सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल)
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले , अध्यक्ष तुषार गांधी, सचिव अॅड. सौ. मधुबाला भोसले , प्रशासकीय संचालिका स्वाती फुले, आनंदवन प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक प्रदीप चव्हाण, तर सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक नागेश पाठक यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
