। लोकजागर । फलटण । दि. 24 सप्टेंबर 2025 ।
रक्षक रयतेचा न्यूज व महिला मंच फलटण तर्फे नवरात्रीनिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धा व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. माळजाई मंदिर येथे 28 सप्टेंबर रोजी या कार्यक्रमांची उत्साहात रंगत वाढणार आहे.

या उपक्रमात रक्षक रयतेचा न्यूज, महिला मंच फलटण, गगनगिरी ज्वेलर्स फलटण, लायन्स क्लब माळजाई मंदिर उद्यान समिती फलटण व नंदाज युनिक किचन फलटण यांचा संयुक्त सहभाग आहे. महिलांसाठी “नवरंग नवरात्री फोटो स्पर्धा” ठेवण्यात आली असून, नऊ रंगातील साडीच्या वेशभूषेतील फोटो दररोज दिलेल्या क्रमांकावर पाठवायचे आहेत. ज्याचा नंबर येईल त्या गटातील प्रत्येक महिलेला बक्षीस दिले जाणार असून दररोज प्रत्येक रंगाला स्वतंत्र बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 150 रुपये प्रवेश फी आहे. बक्षीस वितरण 28 सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता माळजाई मंदिर येथे होणार आहे.

त्याचबरोबर पाककला स्पर्धा (उपवासाचे पदार्थ) आयोजित करण्यात आली आहे. सहभागी महिलांनी पदार्थ घरून बनवून आणायचे आहेत. पदार्थासोबत रेसिपी, स्पर्धकाचे नाव व मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. या स्पर्धेत प्रत्येक सहभागीला हमखास गिफ्ट मिळणार असून प्रथम तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी 100 रुपये प्रवेश फी निश्चित करण्यात आली आहे.
कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासाठी 28 सप्टेंबर रोजी महाभोंडला आणि खुल्या दांडिया (मोफत) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व कार्यक्रम माळजाई मंदिर फलटण येथे संध्याकाळी पाच वाजता सुरू होतील.
अधिक माहितीसाठी सौं. असिफा शिकलगार (8010239062), सौं. रूपाली कचरे (9226720881), सौ. नंदा बोराटे (9766000320), निता दोशी (9420999917), सौ. मनीषा घडिया (7020467682), प्रियांका सस्ते (9284274913), सौ. सुवर्णा शिंदे (7498618183), सौं. अनुराधा रणवरे (8668336313), उज्वला गोरे (8830311213) यांच्याशी संपर्क साधावा.
