। लोकजागर । फलटण । दि. 27 सप्टेंबर 2025 ।
फलटणमध्ये पहाटेपासून काही प्रमाणात विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरण ढगाळ असून पावसाची संततधार सुरूच आहे.

दिवसभर पाऊस सुरू राहिल्यास पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

दरम्यान, काल दि. 26 रोजी दिवसभर हवामान ढगाळ राहूंन काही काळ पाऊस बरसला होता. भारतीय हवामान विभागामार्फत राज्यात नांदेड, लातूर, धाराशिव, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या नऊ जिल्ह्यांसह पुणे घाट, सातारा घाट आणि कोल्हापूर घाट परिसरात २७ सप्टेंबर २०२५ रोजीसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
