लोकजागर | फलटण | दि. 27 ऑक्टोबर 2025
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रूपाली चाकणकर या आज, सोमवार दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत.
या भेटीदरम्यान त्या रुग्णालयातील महिलांसाठी असलेल्या सुविधांची पाहणी करतील तसेच नुकत्याच घडलेल्या महिला डॉक्टर आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महिला सुरक्षेशी संबंधित मुद्द्यांवर प्रत्यक्ष आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना देण्याची शक्यता असून, त्यांच्या या दौऱ्याकडे फलटणवासियांचे लक्ष लागले आहे.
