फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिसऱ्या दिवशीही अर्ज शून्य

लोकजागर – फलटण – दि. 12 नोव्हेंबर 2025

फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज तिसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवार दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी, सर्व प्रभागांमधून एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झाला नाही.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपर्यंत एकूण अर्जसंख्या शून्यच आहे. अर्ज भरण्याची मुदत पुढील काही दिवस शिल्लक असली तरी उमेदवारांकडून अपेक्षित हालचाल दिसत नसल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू झाली आहे.

Spread the love