। लोकजागर । सातारा । दि. 10 डिसेंबर 2025 ।
लेखक व व्याख्याते सचिन गोसावी यांचे वडील रामचंद्र भिकन गोसावी यांचे दि. ३ डिसेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. निधनसमयी ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व चार नातवंडे असा परिवार आहे.
अत्यंत हुशार, मितभाषी व समाजप्रिय व्यक्तिमत्व हरपल्याने संपूर्ण फलटण तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
