फलटणमध्ये प्रचाराचा धडाका! उद्या अभिनेता ‘गोविंदा’ची भव्य रॅली; श्रीमंत अनिकेतराजे व शिवसेना – आघाडीच्या उमेदवारांसाठी मैदानात

| लोकजागर | फलटण | दि. १८ डिसेंबर २०२५ |

फलटण नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि कृष्णा भीमा विकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी उद्या, शुक्रवार दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी प्रख्यात सिनेअभिनेते गोविंदा फलटणमध्ये येणार आहेत.

प्रभू श्रीराम मंदिरापासून रॅलीचा प्रारंभ

श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या विजयाचा संकल्प सोडण्यासाठी ही भव्य रॅली आयोजित करण्यात आली आहे. उद्या दिनाक १९ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता ऐतिहासिक प्रभू श्रीराम मंदिर येथून या रॅलीला दिमाखात सुरुवात होईल. या रॅलीमध्ये आघाडीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

बॉलिवूड स्टार ‘गोविंदा’ आकर्षणाचे केंद्र

लोकप्रिय अभिनेते गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे फलटणकरांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी आणि महायुती-आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी फलटणमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या रॅलीच्या निमित्ताने श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आपली ताकद दाखवून देणार असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली निर्णायक मानली जात आहे.

Spread the love