पाल येथे मातंग समाजाचेदोन दिवसीय महाअधिवेशन संपन्न

| लोकजागर | फलटण | दि. ०१ फेब्रुवारी २०२५ |

महाराष्ट्र प्रदेश मातंग ऑल इंडिटा मातंग सेनेचे अध्यक्ष पी. जी. माने यांच्या अध्यक्षतेखाली पाल (ता.कराड) येथे दोन दिवसाचे 19 वे मातंग समाज महाअधिवेशन संपन्न झाले.

अधिवेशनाचे उद्घाटन दिलीप सोनावले (तारळे) यांचे हस्ते संपन्न झाले. मातंग सेना, पुणेचे सहसचिव विनोद सोनवणे, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा सौ. उषा नेटके, सोलापूर जिल्हाध्यक्ष मधुकर साठे, सातारा जिल्हाध्यक्ष संभाजी मिसाळ, सातारा जिल्हा सचिव शेखर अवघडे, पुणे विभाग अध्यक्ष चंद्रकांत सकट, जगन्नाथ खुडे (शेगाव), मागासवर्गीय वंचित महासंघाचे संस्थापक मोहन कांबळे, धोंडीराम भिसे (रायगांव), ठामदेव सोनावले (मलकापूर), राम फाळके (ठाणे) आदींनी या
महाअधिवेशनात उपस्थितांना मार्गदर्शन केले. अधिवेशनात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पी. जी. माने यांची नियुक्ती करावी, भारतीय सेना दलात मातंग बटालीयन सुरु करावी, भूमिहीन मातंग समाजाला गायरान मिळावे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, कोल्हापूर जिल्ह्याला कायमस्वरुपी जिल्हा व्यवस्थापन मिळावे, तोफखाना सातारा येथील मूळ जमिन मातंग समाजाला मिळावी, श्री खंडोबा देवस्थान, पाल येथील देवासमोर लाठी काठ्या, कुर्‍हाडीचा मान मातंग समाजाला मिळाला आदी ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

या सर्व मंजूर ठरावांच्या मागणीचे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे पाठवून देण्यात आले आहे.

Spread the love