दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

अमरावती, दि.28 (जिमाका): आगामी लोकसभा निवडणुकीत दिव्यांग आणि जेष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व जेष्ठ मतदारांसाठी मुलभुत सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेचा सर्व पीडब्ल्यूडी (पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेला सोयी सुविधा प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन पीडब्ल्यूडी नोडल अधिकारी जया राऊत यांनी केले आहे.

पीडब्ल्यूडी (पर्सनल व्हीथ डिसॲबेलिटी) मतदारांकरिता आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सोयी सुविधा देण्यात येत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक पीडब्ल्यूडी मतदाराने सक्षम ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून घ्यावा. निवडणूक संदर्भात सेवा घेण्याकरीता दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग वयोवृद्ध मतदारांना या सक्षम ॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहायतेची मागणी नोंदविता येईल. त्याद्वारे मतदार संघातील दिव्यांग वयोवृद्ध मतदानाचे मतदार संघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर पीडब्ल्यूडी मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर, सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून पीडब्ल्यूडी मतदार मिळवू शकतो.

सक्षम ॲपवर अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. दृष्टीहीन असलेल्या पीडब्ल्यूडीसाठी आवाज प्रदान करते. श्रवण अक्षम असलेल्या पीडब्ल्यूडीसाठी ॲप- टेक्स्ट-टु-स्पीच प्रदान करते. ॲप मध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे पीडब्ल्यूडीसाठी वापरणे सोपे होते. ॲपमध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून ज्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशिलांचा समावेश आहे. पीडब्ल्यूडीला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल ॲपवर तक्रारी नोंदविता येते.

पीडब्ल्यूडीसाठी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून वापरण्यास सोपा आहे. ज्यामुळे पीडब्ल्यूडीला मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्यांचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होते. जिल्ह्यातील सर्व पीडब्ल्यूडी मतदारांनी सक्षम ॲप डाऊनलोड करून विविध सुविधेचा लाभ घ्यावा.

Spread the love

7 thoughts on “दिव्यांग व जेष्ठ मतदारांना ‘सक्षम ॲप’ ठरणार मदतगार

  1. An interesting discussion is definitely worth comment. I believe that you ought to write more about this topic, it may not be a taboo matter but typically folks don’t discuss such subjects. To the next! All the best!

  2. You are so awesome! I do not suppose I’ve read through anything like that before. So wonderful to find somebody with some unique thoughts on this topic. Seriously.. thanks for starting this up. This web site is something that is required on the web, someone with a little originality.

  3. When I initially left a comment I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on every time a comment is added I get four emails with the same comment. Is there a way you are able to remove me from that service? Cheers.

  4. I blog often and I seriously appreciate your content. Your article has really peaked my interest. I’m going to take a note of your blog and keep checking for new details about once a week. I opted in for your RSS feed too.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *