। लोकजागर । फलटण । दि. 0५ फेब्रुवारी 202५ ।
सुमारे 150 वर्षांची शैक्षणिक परंपरा लाभलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या नामाकिंत विद्यालयाच्या प्राचार्यपदी राजाळे (ता.फलटण) येथील वसंतराव शेडगे यांची नियुक्ती करण्यात आली.
प्राचार्य शेंडगे यांनी यापूर्वी (1993 ते 2000) सरलष्कर बहाद्दर श्रीमंत बाबाराजे खर्डेकर माध्यमिक विद्यालय हनुमंतवाडी, (2000ते 2004) सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, (2004 ते 2010)मुधोजी हायस्कूल फलटण, (2012ते 2017) सालपे माध्यमिक विद्यालय सालपे, रावडी माध्यमिक विद्यालय, (2017 ते 2021) आदर्की माध्यमिक विद्यालय आदर्की येथे उपशिक्षक या पदावर काम केले आहे. तसेच तसेच (2021 ते 2023) मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे पर्यवेक्षक म्हणून काम केले असून (2023 ते 2025) पर्यंत श्रीमंत सगुणामाता माध्यमिक विद्यालय दालवडी येथे मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते.
दरम्यान, सदर नियुक्तीबद्दल प्राचार्य शेडगे यांचे फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासन अधिकारी श्री अरविंद निकम, तपासणी अधिकारी दिलीप राजगुडा, माजी प्राचार्य सुधीर अहिवळे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, राजाळे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.