बघा कशा आहेत आपल्या प्रसिद्ध राजकारण्यांच्या ‘घिबली’ स्टाईल इमेज
। लोकजागर । फलटण । दि. ३१ मार्च २०२५ ।
सतत वेगवेगळे ट्रेंडस् सोशल मिडीयावर लोकप्रिय ठरत असतात. त्यामध्ये सध्या ए.आय. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ‘घिबली’ इमेज तयार करण्याची भर पडली आहे. चॅट जिपीटी ने लाँच केलेले हे नवीन फिचर मोठ्या प्रमाणावर नेटीझन्सच्या पसंतीस उतरले असून हे फीचर वापरुन वेगवेगळे फोटो अपलोड केले जात आहेत. विशेष म्हणजे सर्वसामान्य युजर्सपासून अगदी राजकारण्यांनाही या नवीन तंत्रज्ञानाची चांगलीच भूरळ पडली आहे.

घिबली आर्ट ही जपानी कलाकृती मानली जात असून ‘स्टुडिओ घिबली’ हा जपानी अॅनिमेशन स्टुडिओ आहे. ही कला भावनिकरित्या तयार केलेल्या स्टोरी लाईन आणि हाताने काढलेल्या अॅनिमेशन कॅरेक्टरचा संदर्भ देते.



राजकारण्यांकडूनही या तंत्रज्ञानाचा वापर करुन वेगवेगळे फोटो सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आले असून यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम, फलटणचे आमदार सचिन पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ. रुपाली चाकणकर यांनी सोशल मिडीयावर अपलोड केलेल्या ‘घिबली’ इमेज त्यांच्यासाठी भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे असलेले क्षण व्यक्त करत आहेत.


