। लोकजागर । सातारा । दि. 0६ फेब्रुवारी २०२५ ।
दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेईकल) मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याचा जिल्ह्यातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी (अर्ज करण्यासाठी) पोर्टल https://register.mshfdc.co.in ही लिंक दिनांक १० फेब्रुवारी २०२५ दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, सातारा येथे संपर्क साधावा.